बेळगाव – सीमावादावरून सातत्याने महाराष्ट्राला डिवचणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र विधिमंडळाने मंजूर केलेला ठराव बेजबाबदारपणाचा असल्याचे म्हटले. महाराष्ट्राचा ठराव संघराज्यीय रचनेविरोधातील असल्याचा कांगावाही त्यांनी केला.
…मग कॉंग्रेस अनुयायांनी राहुल गांधींच्या मागे निर्वस्त्र फिरावे; भाजप नेत्याची हिणकस प्रतिक्रीया
महाराष्ट्राच्या ठरावाचा मी निषेध करतो. दोन्ही बाजूंचे लोक अतिशय शांततेने राहत आहेत. मात्र, राजकारणासाठी अशाप्रकारचे ठराव करण्याची महाराष्ट्राची सवयच आहे. एक इंच जागाही न देण्याच्या भूमिकेवर कर्नाटक ठाम आहे. संबंधित प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे ठरावासारख्या बाबींना काही अर्थ नाही. कर्नाटकची भूमिका घटनात्मक आणि वैध स्वरूपाची आहे.
…मग कॉंग्रेस अनुयायांनी राहुल गांधींच्या मागे निर्वस्त्र फिरावे; भाजप नेत्याची हिणकस प्रतिक्रीया
त्यामुळे आम्हाला न्याय मिळण्याचा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कर्नाटक कॉंग्रेसनेही बोम्मई यांच्या सुरात सूर मिसळला. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनीही महाराष्ट्राच्या ठरावाचा निषेध केला. संपूर्ण कर्नाटक राज्य एकवटलेले आहे. महाराष्ट्राला एकही गाव मिळू दिले जाणार नाही, असे त्यांनी म्हटले.