नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते सलमान खुर्शिद यांनी राहुल गांधींची तुलना प्रभु रामचंद्राशी केली असेल तर आता कॉंग्रेस जनांनी रामाची सेना जशी रामचंद्रांच्या मागे नग्न हिंडत होती तसेच आता त्यांनी नग्न हिंडावे अशी हिणकस प्रतिक्रीया भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस दुष्यंत गौतम यांनी दिली आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्प भू संपादन प्रकरणाची चौकशी करणार; महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
एएनआयशी बोलताना गौतम म्हणाले, “जर राहुल गांधी हे रामाचा अवतार असतील त्यांची ‘सेना’ कपड्यांशिवाय का फिरत नाही. प्रभू रामाच्या ‘सेने’प्रमाणे नग्न फिरा. जर कडाक्याच्या थंडीतही राहुल गांधी यांना थंडी वाजत नसेल तर राहुल गांधी नेमके काय खातात हे त्यांनी त्यांच्या अनुयायांना सांगावे असेही त्यांनी म्हणाले आहे.राहुल गांधी जो प्रसाद खातात तोच प्रसाद त्यांनी आपल्या सेनेलाही द्यावा, जेणेकरून त्यांनाही थंडीत कपडे घालावे लागणार नाहीत, असेही ते म्हणाले.
अयोध्येतील रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनीही सलमान खुर्शीद यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. कोणीही भगवान राम असू शकत नाही आणि भरतही असू शकत नाही. राहुल गांधींची कधीच रामाशी तुलना होऊ शकत नाही. सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींची तुलना रामाशी केली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो,असे सत्येंद्र दास यांनी म्हटले आहे.
काल सोमवारी पत्रकारांना संबोधित करताना कॉंग्रेस नेते खुर्शीद म्हणाले होते की, राहुल गांधी महामानव आहेत. आपण थंडीत गोठत असताना आणि जॅकेट घालत असताना, भारत जोडो यात्रेत ते टी-शर्टमध्ये बाहेर फिरत आहेत. ते एखाद्या योगी व्यक्तीप्रमाणे त्यांची ‘तपस्या’ करत आहेत असे नमूद करताना त्यांची तुलना प्रभु रामचंद्राशी केली होती.