म्हाळुंगे – शैक्षणिक क्षेत्रात पेरीविंकलने संस्थेने भरारी घेतली असून शाखा विस्तारातून पेरीविंकल शिक्षण समूहाने उत्तुंग उड्डाण केले आहे, अशा शब्दांत राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी कौतुक केले.
पेरीविंकल इंग्लिश मीडियम स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेजच्या पिरंगुट आणि पौड शाखेचे दिमाखदार स्नेहसंमेलन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे झाले, यावेळी आमदार शिंदे बोलत होते. “युगांतर’ अशी आगळी-वेगळी संकल्पना माजी जलसंपदा मंत्री, आमदार शशिकांत शिंदे, सुप्रसिद्ध अभिनेत्री दिव्या फुगावकर ऊर्फ माऊ (मुलगी झाली हो फेम) यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हा महिला संघटिका संगीता पवळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, संचालक संदीप ढमढेरे, क्रीडा पत्रकार संजय दुधाणे, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, माऊली पवळे, राहुल पवळे, पौडचे सरपंच अजय कडू, लवळे ग्रामपंचायत उपसरपंच रंजीत राऊ, लवळे ग्रामपंचायत सदस्य गणेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
“पेरीविंकल’च्या विद्यार्थ्यांनी कृष्णधवल चित्रपटातील गाण्यांच्या प्रदर्शनातून आधुनिक बदलत्या युगातील संकल्पनेवर आधारित गाण्यांच्या नृत्यातून पाहुणे व प्रेक्षकांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात आले. पिरंगुट-पौड शाखेचे मुख्याध्यापक यांनी वार्षिक अहवाल सादर केला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक राजेंद्र बांदल व संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याध्यापक टकले, पूनम पांढरे, सना इनामदार, पल्लवी नारखेडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. प्रस्तावना आणि पाहुण्यांचे स्वागत वैभव मुरकुटे यांनी केले.