अहमदाबाद – गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री जय नारायण व्यास यांनी आज प्रदेश कॉंग्रेस कार्यालयात त्या पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे पुत्र समीर हेही कॉंग्रेसमध्ये सहभागी झाले. कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांचा सत्कारही केला.
भाजपला गुजरात हातातून जाण्याची भीती – मल्लिकार्जुन खर्गे
व्यास यांनी 5 नोव्हेंबर रोजी भाजपचा राजीनामा दिला होता. पण त्यासाठी त्यांनी कोणतेही कारण स्पष्ट केले नव्हते. आपल्या वैयक्तिक कारणासाठी आपण भाजप सोडत आहोत, असे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता, असे सांगण्यात येते.
भारतीय जनता पक्षाने गुजरातमधील 42 विद्यमान आमदारांना यंदा ( Gujarat Election ) उमेदवारी नाकारली आहे. यातील अनेकांनी भाजपच्या विरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे त्यांनी भाजपपुढे एक मोठे आव्हान निर्माण केल्याचे सांगितले जात आहे.