विविध उपक्रमांचे आयोजन
कोपर्डे हवेली : सह्याद्री सहकारी कारखान्याचे चेअरमन व माजी सहकार व पणनमंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असलेल्या सह्याद्री शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण विद्यालय यशवंतनगर (ता.कराड) येथे युवा नेते सह्याद्री शिक्षण संस्था व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संचालक जशराज पाटील बाबा यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कोपर्डे हवेली येथील युवा उद्योजक सिद्धार्थ चव्हाण व मित्रमंडळाच्यावतीने विद्यालयातील होतकरू विद्यार्थिनींना सायकल व शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच वाढदिवसानिमित्त विद्यालयात रांगोळी सुंदर हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले.
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत त्यांच्या समाजकारणाचा वसा घेऊन स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब यांनी कराड व परिसरात सहकार,शिक्षण, क्रीडा क्षेत्रात भरीव काम करून यशवंत विचार रुजवला तोच वारसा घेऊन कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील यांनी समाजसेवेचे व्रत जोपासले. समाजकारणाचे हेच बाळकडू जशराज पाटील यांना मिळाल्याने त्यांनी आपल्या वाढदिनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. त्यास युवा वर्गाने मोठा प्रतिसाद दिला. समाजकार्याचा वारसा जशराज पाटील यांच्या रूपाने पुढच्या पिढीत पोहोचल्याचा आनंद मान्यवरांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात व्यक्त केला.
या प्रसंगी कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, कामगार कल्याण अधिकारी एन. आर. जाधव, फायनान्शिअल अधिकारी एच. टी. देसाई, चीफ अकाऊंटं मोहन पिसाळ, युवा उद्योजक सिद्धार्थ चव्हाण, धैर्यशील पाटील, संदीप चव्हाण, मारुती बुधे, दत्तात्रय शेलार, उत्तम चव्हाण, सागर चव्हाण, प्रवीण (दादा) थोरात, गणेश नलवडे, भरत थोरात, शुभम चव्हाण, गणेश चव्हाण, अजित चव्हाण व युवा कार्यकर्त्यांसह सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस .एल राठोड, विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एच. डुबल, संभाजी चव्हाण (सर), प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर, विद्यार्थी उपस्थित होते.