मुंबई – बीसीसीआयने महिला क्रिकेटर्सना देखील पुरुष क्रिकेटर्सप्रमाणे वेतन देण्याचा निर्णय जाहीर केला आणि अवघ्या जगाचे लक्ष या निर्णयाकडे वेधले गेले.अनेकांनी या समान वेतनाबाबतच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. बॉलिवूडमधून देखील आता याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. बॉलिवूड किंग शाहरुख खानने देखील या निर्णयाचे कौतुक केले आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट केले की, “मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, बीसीसीआयने भेदभाव मिटवण्यासाठी पहिले पाऊल उचलले आहे.आम्ही महिला क्रिकेटपटूंसाठी वेतन समान धोरण राबवत आहोत असे म्हणत शहा यांनी क्रिकेटमध्ये समान वेतन सुरु करत असल्याची घोषणा केली. याबाबतचे एक ट्विट देखील त्यांनी केले.अभिनेता शाहरुख खानने हे ट्विट शेअर करत निर्णयाचे स्वागत केले आहे.
What a good front foot shot असं म्हणत शाहरुखने या धाडसी निणर्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो, स्पोर्ट्स आपल्याला नेहमीच समानता शिकवतो.हा निर्णय इतरांनाही असं करण्याची प्रेरणा देईल असा विश्वास शाहरुखने व्यक्त केला आहे.
What a good front foot shot. Sports being such an equaliser ( in more ways than one ) hoping it will pave the way for others to follow. https://t.co/Ko1pZpWm8z
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 27, 2022
आता किती फीज मिळणार महिला क्रिकेटर्सना
महिला क्रिकेटपटूंना त्यांच्या सहकारी पुरुष खेळाडूंइतकीच मॅच फी दिली जाणार आहे. कसोटी सामन्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यासाठी 6 लाख रुपये आणि टी-20 साठी 3 लाख रुपये आता महिला क्रिकेटर्सना दिले जाणार आहेत.