मुंबई : आदिपुरुष चित्रपटावरून सध्या सोशल मीडियावर चांगले वातावरण तापले आहे. दरम्यान, या चित्रपटातील पत्रावरून आता आरोप आणि आक्षेप घेण्यात येत आहेत. या चित्रपटाच्या वादात आता भाजप आमदार राम कदम यांनी उडी घेतली आहे. ‘हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही.’ असे इशारा देणारे ट्वीट राम कदम यांनी केले आहे.
राम कदम यांनी केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले, ‘आदिपुरुष हा चित्रपट महाराष्ट्राच्या भूमीत प्रदर्शित होऊ देणार नाही. तुटपुंजी प्रसिद्धी मिळवण्यासाठी आदिपुरुष चित्रपटात निर्मात्यांनी आपल्या देवी देवींचे विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. आता वेळ आली आहे. त्यांनी माफीनामा द्यावा.’ अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
#आदिपुरुष फिल्म को महाराष्ट्र के भूमी प्रदर्शित नही होने देंगे#आदिपुरुष फिल्म मे पुनः एक बार फिल्म निर्माताओ ने ओछी पब्लिसिटी पाने के लिये हमारे #देवी #देवताओ विडंबन करके कराडो करोडो हिंदू लोगो की श्रद्धा और आस्था को आहत किया.
अब समय आ गया है .. केवल माफीनामा या विडंबन का
— Ram Kadam (@ramkadam) October 6, 2022
‘चित्रपटाची दृष्य कट करुन काही होणार नाही. अशा घृणास्पद विचारसरणीला धडा शिकवण्यासाठी या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. तसेच जे लोक यासाठी जबाबदार आहेत, त्यांना इंडस्ट्रीमध्ये काही वर्षांसाठी बॅन केलं पाहिजे. जेणेकरून भविष्यात असे करण्याचे धाडस कोणी करणार नाही.’ असेही राम कदम यांनी ट्वीटमध्ये लिहिले.
#आदिपुरुष फिल्म को महाराष्ट्र के भूमी प्रदर्शित नही होने देंगे#आदिपुरुष फिल्म मे पुनः एक बार फिल्म निर्माताओ ने ओछी पब्लिसिटी पाने के लिये हमारे #देवी #देवताओ विडंबन करके कराडो करोडो हिंदू लोगो की श्रद्धा और आस्था को आहत किया.
अब समय आ गया है .. केवल माफीनामा या विडंबन का
— Ram Kadam (@ramkadam) October 6, 2022
‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. टीझर रिलीज झाल्यानंतर अनेकांनी या चित्रपटाला ट्रोल केलं. चित्रपटात प्रभासने राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. या टीझरमधील VFX ला आणि सैफच्या लूकला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहेत.