मुंबई – सिनेसृष्टीमध्ये असे अनेक आर्टिस्ट आहेत जे मोठ्या पडद्यावर फार कमी वेळासाठी झळकले पण त्यांनी केलेला अभिनय किंवा पात्र सर्वांच्या लक्षात राहते. अभिनेत्री प्रिया प्रकाश वरियर हे त्यातीलच एक उदाहरण. साऊथ इंडस्ट्रीमधून आपल्या अभिनयाला सुरुवात करणाऱ्या प्रियाचा डोळा मारतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. परंतु त्यानंतर प्रिया बराच काळ मोठ्या स्क्रिनपासून दूर होती.
बदलत्या वेळेनुसार दिवसेंदिवस प्रिया खूप बोल्ड होत आहे. प्रिया प्रकाशचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिची बोल्ड स्टाईल दाखवताना दिसत आहे. सध्या प्रिया प्रकाश वारियर थायलंडमध्ये आहे आणि तिने एक अतिशय बोल्ड फोटो शेअर केला आहे, ज्याला पाहून तिचे चाहते खूप उत्साहित झाले आहेत. विंक गर्ल म्हणून प्रसिद्ध झाल्यानंतर प्रियाची चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी कायमच आतुर असतात. प्रिया तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तिने केलेल्या बोल्ड पोस्टमुळे सर्व चाहत्यांची झोप उडवली आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे प्रिया प्रकाश वरियरने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तिचा हा बोल्ड अंदाज पाहून अनेक चाहत्यांनी तिचा व्हायरल व्हिडीओ शेअर करत ती हीच अभिनेत्री होती का ? असा सवाल विचारला आहे. विंक व्हिडीओमुळे तिला देशभरात ओळख मिळाली. या व्हिडिओमुळे तिला नॅशनल क्रश म्हणून देखील ओळखलं जाऊ लागलं होत. आजच्या काळात प्रियाचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत.