प्रियाच्या नव्या लुकवर चाहते फिदा

आपल्या नजरेच्या अदांमधून कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर सोशल मीडियावर सतत ऍक्‍टिव आहे. प्रिया तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून सतत फोटो पोस्ट करत राहते.

तिचे फोटो हे चाहत्यांसाठी एक वेगळीच मेजवानी असते. त्यातच प्रिया प्रकाश वॉरियरची आणखी काही सुंदर छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रातोंरात सुपरस्टार आणि सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या प्रियाचा अंदाज आणि लुकचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. एका फोटोमध्ये साडी नेसलेली प्रिया दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती ब्लॅक टॉप आणि ग्रे जीन्समध्ये एकदम हॉट अंदाजात दिसत आहे.

प्रियाच्या या फोटोंना आत्तापर्यंत कोट्यावधी लाइक्‍स मिळाल्या आहेत, तर हजारोंच्या संख्येने कमेंटस्‌ येत आहेत. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास साउथ चित्रपट “ओरु अदार लव’मधील तिच्या दमदार अभिनयाची खुपच स्तुती करण्यात आली होती.

याशिवाय ती लवकरच “श्रीदेवी बंगलो’ आणि “लव हॅकर्स’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटांबाबत चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता लागली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.