मुंबई – मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरच्या ‘ओरु अदार लव्ह’ चित्रपटातील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि प्रिया काही वेळातच राष्ट्रीय क्रश बनली.
2018 च्या या चित्रपटातील गाण्यात प्रियाच्या ‘डोळा मारण्यावरुन’ सर्वांचेच मन जिंकले. त्या एका व्हिडिओमुळे रातोरात हिट झालेली प्रिया प्रकाश आता लाखो दिलांची धडकन बनली आहे.
तेव्हापासून ती सततच सोशल मीडियावर काही ना काही अपडेट देत असते. नवीन लुक, फॅशन ट्रेन्ड, व्हिडिओ काय वाट्टेल ते ती पोस्ट करत असते. नुकतंच तिने आपल्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले असून, यामध्ये अभिनेत्री कमालीची बोल्ड अँड हॉट दिसत आहे.
प्रियाने थायलंड व्हेकेशनमधील काही बिकिनी लूकमधील फोटो शेअर केले आहेत. प्रियाच्या बोल्ड अवतार लूकवरून चाहत्यांना नजर हटवता येत नाही.
प्रियाने प्रिंटेड पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये बोल्ड अवतार दाखवला असून, फॅन्स देखील प्रियाच्या बोल्ड लूकवर फिदा झाले आहेत. सध्या तिचा हा बिकिनी आवतार सगळीकडेच व्हायरल होताना दिसत आहे.