नवी दिल्ली : केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरीमध्ये पर्यटकांच्या एका बसचा भीषण अपघात घडला असल्याची माहिती समोर येत आहे. केएसआरटीसीची बस पर्यटक बसला धडकल्याने झालेल्या या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या अपघातात ३८ जण गंभीररीत्या जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पर्यटक बस एर्नाकुलम जिल्ह्यातील बसलियोस विद्यानिकेतनच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन उटी येथे जात होती. केरळचे राज्यमंत्री एमबी राजेश यांनी याविषयी माहिती दिली. पलक्कड जिल्ह्यातील वडक्कनचेरी येथे केएसआरटीसीची बसच्या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आणि ३८ जण जखमी झाले.
Kerala | 9 dead, 38 injured after a tourist bus crashed into KSRTC bus in VadakKeralakenchery in Palakkad district. The tourist bus was carrying students & teachers of Baselios Vidyanikethan in Ernakulam dist & was going to Ooty https://t.co/xIqHhROqff pic.twitter.com/XimJTDTPhA
— ANI (@ANI) October 6, 2022
पर्यटक बस ही बसलियोस बिद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन एर्नाकुलम येथून उटी येथे जात होती, तर त्याचवेळी केएसआरटीसीची बस कोईम्बतूरच्या दिशेने निघाली होती. या दरम्यान हा भीषण अपघात घडला.
मृतांमध्ये केअसआरटीसी बसमधील पाच विद्यार्थी, एक शिक्षक आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे. तर एकूण ३८ जण रुग्णालयात आहेत. यापैकी पाच जण गंभीर जखमी आहेत.