मुंबई – चलनबाजारात भारतीय रूपयाची किंमत पुन्हा 49 पैशांनी घसरून डॉलरची किंमत 81 रूपये 89 पैसे इतकी झाली आहे. भारतीय बाजारातून विदेशी गुंतवणूक काढून घेण्याचा प्रकार अजून थांबलेला नाही. त्यामुळे त्याचा भार भारतीय चलनावर पडत आहे. आज दिवसभरात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून सुमारे 1565 कोटी रूपयांची गुंतवणूक काढून घेतली.
काल बाजार बंद होताना रूपयाची किंमत 81 रूपये 40 पैसे इतकी होती. आजच्या व्यवहारात डॉलर जळपास 82 रूपयांवर पोहचला होता. परंतु तो नंतर 81 रूपये 89 पैशांवर स्थीरावला. दरम्यान तेलाच्या बाजारातही ऑईल बॅरलच्या किंमतीत वाढ होऊ लागल्याचे दिसत आहे. आज कच्चा तेलाच्या दरात 4.12 टक्के इतकी वाढ होऊन कच्चा तेलाचा दर प्रति बॅरल 88,65 इतका झाला.