पिंपरी, दि. 1 (अमोल शित्रे) -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी विधानसभा मतदार संघातच आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला नाराजीचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पिंपरी विधानसभेतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे हे गेल्या काही दिवसांपासून कमालीचे नाराज दिसत आहेत. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांची अनुपस्थिती बोचणारी असतानाही वरिष्ठ नेत्यांकडून मात्र समजूत काढण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.
बनसोडे यांच्या नाराजीमुळे पिंपरी विधानसभा मतदार संघातील त्यांचे कार्यकर्तेही नाराज झाले आहे. ही नाराजी दूर करण्यात नेत्यांना अपयश आले तर आगामी काळात राष्ट्रवादीला आपल्याच बालेकिल्ल्यात जबरदस्त फटका बसण्याची शक्यता आहे. 2014 सालच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला शहरात खाते देखील उघडता आले नव्हते. त्या पाठोपाठ 2017 च्या महापालिका निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठ्या फरकाने सत्ता गमावावी लागली. 2019 साली मात्र भाजप-शिवसेना युतीसाठी पोषक वातावरण असतानाही बनसोडे यांनी पिंपरी विधानसभा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यातून पुन्हा काबीज केला. बनसोडे यांच्या विजयाने पक्षाला पुन्हा उर्जा मिळाली. दुभंगलेल्या कार्यकर्त्यांची मोठ बांधून बनसोडे यांनी पिंपरीत पुन्हा पक्ष बळकट केला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बनसोडे हे पक्षावर नाराज आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित नेते मंडळींमध्ये आमदार बनसोडे यांची गैरहजेरी खूप काही सांगून जात (पान 4 वर)
नाराजी कसली?
आमदार बनसोडे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतेवेळी अजित पवार यांना उघडपणे समर्थने देणारे आमदार बनसोडे हेच होते. नंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पक्षाकडून बनसोडे यांना कठीण काळात मदत झाली नाही. या नाराजीतून बनसोडे राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला गैरहजेरी लावत असल्याचे बोलले जाते. परंतु, 2019 ला मावळ लोकसभेतून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार निवडणूक मैदानात असताना त्यांना पिंपरीतून अपेक्षित मतदान झाले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. पिंपरीत प्राबल्य असताना लोकसभा निवडणुकीत पार्थ यांना अपेक्षित मते न मिळाल्याची खंत अजित पवार यांच्या मनात अजूनही असल्याची आणि त्यामुळे ते बनसोडे यांची नाराजी दूर करत नसल्याची चर्चा मात्र रंगत आहे.