तब्बल ७० वर्षांनंतर चित्ता भारतात दिसणार आहे. नामिबियातील आठ परदेशी चित्ते ग्वाल्हेरला पोहोचले, ज्यामध्ये पाच मादी आणि तीन नर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये हे चित्ते सोडण्यात आले. नामिबियातून भारतात आलेले चित्ते लोकांमध्ये चर्चेचा विषय राहिले आहेत.
भारतातील जंगलात सिंह, वाघ आणि बिबट्या आढळतात. १९४७ मध्ये चित्ता देशात शेवटचा दिसला होता, त्यानंतर भारत सरकारने १९५२ मध्ये चित्ता नामशेष झाल्याचे घोषित केले होते. मात्र, बर्याच काळानंतर भारतात सिंह, वाघ, बिबट्या याशिवाय चित्ताही दिसणार आहेत. जंगलात राहणारे हे चारही प्राणी खूप शक्तिशाली आहेत. (Differences between Cheetah, Leopard, Lion & Tiger) आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सिंह, वाघ, बिबट्या आणि चित्ता यांच्यात काय फरक आहे?
चित्ता :-
चित्ता हा जगातील सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. चित्ता साधारणपणे ११२ किमी प्रतितास वेगाने धावतो. तो जास्तीत जास्त १२० किमी प्रतितास वेगाने पोहोचू शकतो. पण चित्ता धावत लांब पल्ला गाठू शकत नाही. तो फक्त एका मिनिटासाठी जास्तीत जास्त वेगाने धावू शकतो. चित्ता तीन सेकंदात १०० किमी प्रतितास वेग गाठू शकतो.
सिंह :-
जंगलाचा राजा सिंह ताशी ८० किलोमीटर वेगाने धावू शकतो. सिंहाचे शरीर मोठे आणि वजनदार असते. परंतु असे असूनही, त्याची गर्जना आणि ताकद जंगलात सर्वात धोकादायक मानली जाते. सिंह १० फूट लांबीपर्यंत वाढू शकतात आणि २५० किलोग्रॅमपर्यंत त्यांचे वजन असू शकते. आफ्रिका आणि भारतात सिंह आढळतात. सिंहामध्ये इतकी ताकद असते की तो कोणत्याही मोठ्या प्राण्याची शिकार करू शकतो. तो म्हशीलाही सहज मारू शकतो.
वाघ :-
वाघाची लांबी १० फूट असून वजन ३०० किलोपर्यंत असते. वाघाचा धावण्याचा वेग ताशी ६४ किलोमीटर आहे. वाघाचे वजन सिंहापेक्षा जास्त असते. वाघ भारत, इंडोनेशिया, रशिया आणि भूतानच्या पर्वतांमध्ये आढळतात. वाघ हरीण आणि रानडुकरांसह अनेक प्राण्यांची शिकार करतात. वाघाने आपला पंजा भक्ष्याभोवती आवळला की, त्याची सुटका होणे कठीण असल्याचे सांगितले जाते.
बिबट्या :-
चित्त्यापेक्षा अधिक शक्तिशाली असलेला बिबट्या भारत आणि आफ्रिकेत आढळतो. त्याची कमाल लांबी ६.२ फूट असून तो ताशी ५८ किलोमीटर वेगाने धावू शकतो. बिबट्या सहसा रात्री शिकार करतात, कारण त्यांना सिंह आणि वाघ यांच्या हल्ल्याची भीती असते. ते कोणत्याही मध्यम आकाराच्या प्राण्याची शिकार करू शकतात. ते माणसांवरही हल्ले करतात.