नांदेड – नांदेडमध्ये पोलीस भरतीच्या मागणीवरून विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेडमध्ये कार्यक्रमस्थळी पोहचताच विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पोलीस भरती झाली पाहिजे अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात गोंधळ घातला आहे. रखडलेल्या भरती झाली पाहिजे, अशी मागणी देत विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्याने गोंधळ उडाला. यानंतर विद्यार्थ्यांना भेटून काहीही न बोलताच फडणवीस इथून रवाना झाले.
पहा विडिओ