मुंबई – KGF स्टार यश आणि त्याची पत्नी राधिका पंडित सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दोघेही कौटुंबिक फोटो इंटरनेटवर शेअर करत असतात. कन्नड स्टार यशची पत्नी राधिका पंडितने नुकताच तिच्या पतीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. हे फोटो पाहून चाहते खुश झाले. एवढेच नाही तर चाहत्यांनी या फोटोंवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
चाहत्यांना या जोडीचे फोटो खूपच आवडले आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी यशने केजीएफमधील लूक न बदलल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काही युजर्सने केजीएफ ३ चे शूटिंग सुरु झाले का ? असे प्रश्न देखील विचारले आहेत. राधिकाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये दोघीही पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत आहेत. यश पांढऱ्या कुर्त्यामध्ये जबरदस्त दिसत आहे. तर त्यांची पत्नी राधिका पंडित काळ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
हे फोटो साऊथ इंडियन इंटरनॅशनल अवॉर्ड्सशो दरम्यानचे आहेत. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोंना लाईक केले आहे.यश नुकताच युरोप टूरवर गेला होता त्यावेळी देखील चाहत्यांसोबत त्याने काढलेले फोटो चांगलेच व्हायरल झाले होते.