नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काढले छायाचित्र
न्यूयॉर्क : आपल्या सूर्यमंडळा बाहेरही अनेक ग्रह आणि तारे आहेत अशा अनेक ग्रह आणि ताऱ्यांचा अधूनमधून शोध लागत असतो. नासाच्या वेब स्पेस टेलिस्कोपने अशाच एका नव्या ग्रहाचे छायाचित्र टिपले असून या ग्रहावर कार्बन-डाय-ऑक्साइडचे साठे असल्याचेही उघडकीस आले आहे.
आपल्या सौर मंडलाबाहेर सापडलेल्या या ग्रहाचे नाव डब्ल्यू ए एस पी थर्टी नाईन असे ठेवण्यात आले असून हा ग्रह एका ताऱ्याला प्रदक्षिणा घालत असल्याचे लक्षात आले आहे. हा ग्रह पृथ्वी पासून सातशे प्रकाशवर्ष दूर असून आपल्या सूर्य मंडळातील गुरु या ग्रहापेक्षा तो मोठा असून या ग्रहाला यांनी गुरूचा भाऊ असेच नाव दिले आहे.
या ग्रहावरील तापमान तब्बल 900 अंश सेल्सियस असून तो आपल्या ताऱ्याच्या खूप जवळून प्रदक्षिणा घालत असल्याने त्याचे तापमान जास्त आहे. या ग्रहाला आपल्या तार्या भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास पृथ्वीवरील चार दिवस लागतात. 2011 मध्येच या ग्रहाचा शोध लागला होता पण आता नासाच्या टेलिस्कोपने या ग्रहाचे छायाचित्र काढल्याने त्या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. पूर्वी या ग्रहावर वाफ सोडियम आणि पोटॅशियम असल्याचे सिद्ध झाले होते आता जेम्स वेब टेलिस्कोपमुळे या ग्रहावर कार्बन-डाय-ऑक्साइडचे अस्तित्व असल्याचेही सिद्ध झाले आहे.