प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 28 -शहराच्या मध्यवस्तीत खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून वाहतूक पोलिसांकडून नियोजन करण्यात आले होते. तरीही, रविवारी मध्य वस्तीतील बाजारात वाहतूक कोंडी सहन करावी लागली.
या परिसरातील महत्त्वाच्या चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात होते. पण, वाहने व रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. शिवाजी रस्त्यावर सर्वात जास्त कोंडी झाली होती. तसेच, मुख्य मिरवणूक मार्गावर असलेल्या झांडाच्या फाद्या वाहतूक पोलिसांनी रविवारी सकाळी तोडल्या. दरम्यान, “गौरी, गणपती उत्सवासाठी मध्यवस्तीमध्ये रविवारी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून वाहतुकीचे नियोजन करण्यात आले होते. विश्रामबाग विभागातील मुख्य चौकात वाहतूक पोलीस नेमण्यात आले होते. नियमन करून कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला,’ असे सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर यांनी सांगितले.