पणजी – सोनाली फोगाट हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून ही केस सीबीआयच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सेलिब्रिटी आणि भाजप नेता सोनाली फोगाट हत्या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे. क्लबमधील सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती आल्यानंतर सोनाली यांची हत्या झाल्याचे अधिक निश्चित झाले आहे. सोनाली यांच्या हत्येमागचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ही केस आम्ही सीबीआयकडेही देऊ. या प्रकरणावर हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी ही केस सीबीआयकडे सोपवावी, अशी विनंती केली होती. दरम्यान, या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआय करणार असल्याने आता कोणते नवीन खुलासे समोर येणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. (CBI investigating BJP leader Sonali Phogat murder; A different twist to the matter)