नाशिक – आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचा लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. बॅंक लॉकर्स आणि जमिनीच्या काही कागदपत्रांच्या संदर्भातील तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनेशकुमार बागुलला कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने मान्य केली.
आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचा आणि महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुलला 28 लाख 80 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती. सेंट्रल किचनच्या वर्क ऑर्डरसाठी एका ठेकेदाराकडून त्याने 28 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली होती. बागुल यांना अटक केल्यानंतर त्यांच्या नाशिक, पुणे, धुळे आदी घरांवर धाडसत्र टाकत कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या लाचखोर अभियंत्यास 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. बागुल याच्याकडे आणखी करोडो रुपयांचे घबाड सापडण्याची शक्यता एसीबीने व्यक्त केली आहे. त्यामुळे अधिक चौकशी करण्यासाठी रिमांड मागितला. (Dinesh Kumar Bagul, Engineer of Construction Department, who was found red-handed while accepting a bribe of 28 lakhs, has been taken into police custody.)