बर्मिंगहॅम – भारताचा वरिष्ठ टेबल टेनिसपटू अचंथा शरथ कमल याने यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या गुणवत्तेची साक्ष देताना पुरुषांच्या टेबल टेनिस एकेरीत सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने अंतिम फेरीत इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा 11-13, 11-7, 11-2, 11-6, 11-8 असा पराभव केला.
त्याने या स्पर्धेत सुवर्ण वाटचाल करताना साखळीत राऊंड 32 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या फिन लू याचा, राऊंड 16 मध्ये नायजेरियाच्या ओलाजिदे ओमोटोयोवर 4-2 असा, उपांत्यपूर्व फेरीत सिंगापूरच्या इसाक क्वेक योंगचा 4-0 असा, तर उपांत्य फेरीत इंग्लंडच्या पॉल ड्रिंकहलचा 4-2 असा पराभव करत थाटात अंतिम फेरी गाठली होती.
हे बॅडमिंटन पुरुष एकेरीतील त्याचे सोळा वर्षांनंतरचे सुवर्णपदक ठरले. यापूर्वी त्याने 2006 सालच्या मेलबर्न स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. यंदाची स्पर्धा त्याच्यासाठी लक्षवेधी ठरली.
𝗟𝗲𝗴𝗲𝗻𝗱 🏓👏👇
Seven-time #CommonwealthGames 🥇 medallist @sharathkamal1 🇮🇳#EkIndiaTeamIndia | #TeamIndia | #B2022 pic.twitter.com/TZAx4sGZoQ
— Team India (@WeAreTeamIndia) August 8, 2022
त्याने या एकेरीच्या सुवर्णपदकापूर्वी पुरुष सांघिक, मिश्र दुहेरी तसेच पुरुष दुहेरीत रजतपदक पटकावले आहे. या सुवर्णपदकासह त्याचे या स्पर्धेच्या इतिहासातील 13 वे पदक ठरले आहे.