किव्ह – युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी डोनेस्क भागातील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले आहेत. पूर्व डोनेस्क भागात रशियाने आपले हल्ले अधिक तीव्र केले असल्यामुळे झेलेन्सकी यांनी हे आदेश दिले आहेत. डोनबास फ3ांतातील हजारो नागरीक आता अति असुरक्षित भागात रहात आहेत. त्यांनीही आता तेथून निघून जायला हवे, असे झेलेन्सकी यांनी शनिवारी रात्री देशवासियांना उद्देशून केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटले आहे.
जितक्या लवकर आणि जितक्या जास्त प्रमाणात नागरिकांनी डोनबास भाग सोडून निघून जाणे शक्य होईल, तितकेच रशियाच्या फौजांकडून कमी लोकांची जीवितहानी होऊ शकेल, असे झेलेन्सकी म्हणाले. मात्र हिवाळा सुरू होण्यापूर्वीच या लोकांना हलवण्याचे आव्हान युक्रेनच्या प्रशासनापुढे आहे. शुक्रवारी रशियाच्या हल्ल्यात किमान 6 जण ठार झाले, तर 15 जण जखमी झाले आहेत, असे डोनेस्क भागातील प्रशासनाने म्हटले आहे.