मुंबई – साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य ही जोडी सर्वांच्या नजरेत आली होती जेव्हा दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगळे होण्याची घोषणा करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले. घटस्फोट झाल्यापासून दोघेही कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चर्चेत असतात. नुकतीच बातमी समोर आली आहे की, समंथाने नागासोबत लग्न केल्यानंतर ज्या घरात ती राहत होती ते घर विकत घेतले आहे.
घरासोबत आहे इमोशनल बॉन्ड
समांथाने हैदराबादमध्ये खरेदी केलेले घर अनेक अर्थाने अभिनेत्रीसाठी खास आहे. सामंथा तिच्या माजी पती नागा चैतन्यसोबत राहत असलेल्या घराच्या मालकाने अलीकडेच उघड केले की,’जोडप्याने वेगळे झाल्यानंतर घर विकले. पण अभिनेत्रीने मालकाशी बोलून स्वतः घर विकत घेतले. सध्या ती तिच्या घरी आईसोबत राहते.’
अलीकडेच करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये सामंथा नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेण्याचा मुद्यावरही उघडपणे बोलली. याशिवाय सामंथाने सांगितले होते की,’अभिनय हा कधीच तिच्या करिअर प्लॅनिंगचा भाग नव्हता. मात्र घरात पैसे नसल्यामुळे शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून मी हा पर्याय निवडला. त्यानंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही. स्वत:साठी घर विकत घेणे आणि स्वतंत्र स्त्री म्हणून उभे राहणे समंथाला अधिक सुंदर बनवते.’