पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) :- भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. भारतीय संघाने या मालिकेत आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अखेरचा आणि तिसरा सामना जिंकत विंडीजला क्लीन स्वीप देण्याच्या उद्देशाने धवन सेना मैदानात उतरेल.
भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार धवनने प्लेइंग-11 मध्ये बदल केला. आवेश खानच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा प्लेइंग-11 मध्ये पुन्हा समावेश करण्यात आला आहे.
India have elected to bat in the third and final ODI 🏏
Will they complete a clean sweep? 🤔
Watch #WIvIND for FREE on https://t.co/CPDKNx77KV (in select regions) 📺 pic.twitter.com/pa4f3HbF38
— ICC (@ICC) July 27, 2022
दुसरीकडे वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने संघात तीन बदल केले आहेत. जेसन होल्डर, कीमो पॉल आणि कार्टी यांना प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आले आहे. अल्झारी जोसेफ, रोव्हमन पॉवेल आणि रोमारियो शेफर्ड यांना संघातून वगळण्यात आले आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे :-
वेस्ट इंडीज: शाई होप (विकेटकीपर), ब्रॅंडन किंग, कीसे कार्टी, शामराह ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), काइल मेयर्स, जेसन होल्डर, कीमो पॉल, अकिल हुसेन, हेडन वॉल्श, जेडेन सील्स.
भारत : शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रणंद कृष्णा.