मुंबई – अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे देशातील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. दोघांनाही छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवण्याची सवय आहे. दोघेही अनेकदा त्यांच्या रुटीन लाईफशी संबंधित अपडेट्स देत असतात. दोघं एकत्र निसर्गाच्या शोधात निघाले असोत किंवा एकमेकांच्या सहवासात नयनरम्य सूर्यास्त पाहत असोत. दोघेही स्वतःसाठी सुंदर आठवणी आणि खास क्षण तयार करतात. मंगळवारीही असाच काहीसा प्रकार घडला. लंडनमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये या जोडप्याने जेवण केले. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी बॉम्बे बसल नावाच्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये जेवण केले. रेस्टॉरंटचे शेफ सुरेंद्र मोहन यांनी ट्विटरवर या जोडप्यासोबत पोझ देतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “भारताची शान विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी आमच्यासोबत बॉम्बे बसल येथे जेवण केले. त्याबाबद्दल खूप आभिमान आणि आनंद होत आहे.”
चित्रात, विराट कोहली काळ्या टी-शर्ट आणि ऑफ-व्हाइट पँटमध्ये दिसत आहे तर अनुष्का शर्माने ऑफ शोल्डर ग्रे टॉप आणि ब्लू डेनिम घातलेली आहे. फोटोमध्ये दोघेही रेस्टॉरंटच्या शेफसोबत आनंदाने पोज देताना दिसत आहेत. या फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली की, “पुढच्या वेळी कोहली येईल तेव्हा त्याच्या प्लेटमध्ये चिकन लेग ठेवा, मी तुला युरोमध्ये पैसे देईन.
Happy & honoured to have had the wonderfully warm and pride of India @imVkohli and @AnushkaSharma dine with us @BombayBustle
😊🙏🏻🇮🇳#IndianCricketTeam #bollywoodactress #india #indianfood #bestindianrestaurant #london #mayfair #india pic.twitter.com/FNGOATaEbg— Surender Mohan (@SurenderChef) July 25, 2022
अनुष्का शर्माने शेअर केले फोटो
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा त्यांची मुलगी वामिकासह पॅरिसमध्ये त्यांच्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यांच्या हॉटेलची झलक शेअर करण्यापासून ते सिटी ऑफ लाइट्सचे सुंदर रस्ते दाखवण्यापर्यंत, हे जोडपे प्रत्येकाला त्यांच्या सुंदर सुट्टीची झलक देत आहे, चाहत्यांनी या फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत अनेक कमेंट केल्या आहेत.
अनुष्का शर्माचा रॉयल लुक
आदल्या दिवशी, अनुष्का शर्माने स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, शाही खिडकीजवळ उभी होती, पांढर्या टॉपमध्ये हसत होती आणि कॅमेर्यासाठी पोज देत होती. हा फोटो शेअर करत अनुष्काने लिहिले, ‘माझ्या समोरच्या खिडकीत. पॅरिस संगीत”.