मुंबई – मलिका शेरावत बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. आरके/आरके नावाचा मलिकाचा चित्रपट येत्या २२ जुलै रोजी प्रदर्शित होतोय. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मलिका सध्या ठिकठिकाणी जात आहे. यादरम्यान इंडस्ट्रीत आपल्या अभिनयापेक्षा शरीरावर आणि ग्लॅमरकडे जास्त लक्ष दिल्याची खंत मलिकाने व्यक्त केली आहे.
कॉम्प्रमाइज केल्याशिवाय इंडस्ट्रीत काहीही साध्य होत नाही, असे मलिका शेरावतचे म्हणणे आहे. याबद्दल बोलताना ती म्हणते ‘बॉलिवुडमधील मोठ्या स्टारसोबत कॉम्प्रमाइज केल्याशिवाय कोणीही तुमच्यासोबत काम करायला तयार होणार नाही. हे बॉलीवूडचे वास्तव आहे. हे सर्व मी माझ्या अनुभवाने सांगत आहे. ही गोष्ट खोटी आहे असे कोणतीही अभिनेत्री म्हणाली तर ती स्वतः खोटे बोलत आहे असंही मालिकाने यावेळी सांगितलं.
मलिका शेरावत म्हणते,मी प्यार के साइड इफेक्ट, वेलकम आणि दशावतार सारखे हिट चित्रपटही केले आहेत.परंतु तरीही माझ्या अभिनयाकडे कोणीही पाहिले नाही. तर माझ्या ग्लॅमर आणि बोल्ड लुकचीच चर्चा होत राहिली. मलिका शेरावत सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूपच व्यक्त आहे.