बर्मिंगहॅम – इंग्लंडचा फलंदाज सॅम बिलिंग्जचा महंमद सिराजने पहिल्या डावात त्रिफळा उडवला व त्यावेळी विराट कोहली आनंदाने नाचला. कोहलीच्या या कृतीवर गमतीशीर टीका करताना माजी कसोटीपटू व समालोचक वीरेंद्र सेहवागची जीभ घसरली. कोहलीचा उल्लेख छमिया असा केल्यामुळे सेहवागवर चाहत्यांनी रोष व्यक्त केला. एखाद्या जागतिक किर्तीच्या खेळाडूबाबत वक्तव्य करताना भान ठेवावे, असा सल्लाही सेहवागला चाहत्यांनी दिला.
भारत व इंग्लंडदरम्यान झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या डावात सिराजने टाकलेल्या 60 व्या षटकात बिलिंग्जचा त्रिफळा उडाला. त्यावेळी आनंदाने कोहलीने नृत्याची झलक दाखवली. मात्र, कोहलीच्या आनंदानंतरच्या कृतीवर सेहवागने टिप्पणी करताना भान ठेवले नाही व त्यामुळेच त्याला चाहत्यांचा रोष ओढवून घ्यावा लागला. सेहवागने केलेल्या या वक्तव्याचा व्हिडिओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला. काही क्षणांतच सेहवाग टीकेचा धनीही बनला.
‘Chamiya nach rahi hai’😭😭🤣
What is this behavior
@virendersehwag 😭#ViratKohli #ENGvsIND sehwag pic.twitter.com/pVjBoTYBO0— Pk45🇮🇳 𓃶 (@Vitamin_purutin) July 3, 2022
आक्रमकता हेच धोरण हवे
गेल्या काही काळापासून कोहली सातत्याने अपयशी ठरत आहे. त्याला जवळपास तीन वर्षांत एकही शतक साकार करता आलेले नाही. त्यावर भाष्य करताना सेहवागने कोहलीला सल्लाही दिला आहे. वारंवार अपयशी ठरत असताना ऋषभ पंतने आक्रमक धोरण ठेवत फलंदाजी केली व यश मिळवले. तेच आता कोहलीने केले पाहिजे.
आक्रमकता हेच बचावाचे योग्य धोरण असते हे कोहलीने लक्षात घेत आक्रमक फलंदाजी करावी. संयमी खेळी करताना बाद होण्याची भीती असतेच पण आक्रमक फलंदाजी केल्यावर गोलंदाजांची दिशा व टप्पा चुकतो व त्याचाच लाभ मलाही माझ्या कारकिर्दीत झाला आहे व कोहलीलाही होईल, असेही सेहवाग म्हणाला.