वेलिंग्टन – जागतिक क्रिकेटमध्ये ऐतिहासिक निर्णय घेत न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने पुरुष क्रिकेटपटूंना जे मानधन दिले जाते तेच महिला क्रिकेटपटूंनाही दिले जाणार असल्याचे जाहीर केले.
महिला व पुरुष क्रिकेटपटूंना समान करार रक्कम तसेच मानधन दिले जावे, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून होत होती. त्यावर मोठा निर्णय घेताना न्यूझीलंड मंडळाने अन्य देशांच्या क्रिकेट मंडळांसमोर आदर्श निर्माण केला आहे. न्यूझीलंड मंडळाने नवा करार जाहीर केला असून, त्यानुसार महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंना समान मानधन मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
नवीन पगार स्केल
कसोटी सामना – $10250 (रु. 8.1 लाख)
एकदिवसीय क्रिकेट सामना – $4000 (3.16 लाख)
T20 क्रिकेट सामना – $2500 (रु. 1.97 लाख)
प्लंकेट शील्ड – $1750 (रु. 1.38 लाख)
फोर्ड ट्रॉफी – $800 (रु. 63,309)
सुपर स्मॅश – $575 (रु. 45503)
हा निर्णय मंडळाशी निगडित सर्व क्रिकेटपटूंना लागू होणार असल्यामुळे एकदिवसीय, टी-20, फोर्ड करंडक व सुपर स्मॅश लीगमध्ये खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंनादेखील त्यांच्या श्रेणीतील पुरुष क्रिकेटपटूंइतकेच मानधन मिळणार आहे. मंडळाने या निर्णयाबरोबरच महिला क्रिकेटपटूंशी करण्यात येणाऱ्या करार रकमेतही वाढ केली आहे.