इस्लामाबाद – पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत झाली आहे त्यामुळे खर्च कमी करण्यासाठी विविध उपायांची योजना करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण पाकिस्तानमध्ये रात्री नऊनंतर स्ट्रीट लाईट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच विवाह समारंभातील खर्चावरही नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत पाकिस्तानमध्ये सध्या विवाहाचा हंगाम सुरू आहे.
त्यासाठी पाकिस्तान प्रशासनाने काही नियम जाहीर केले आहेत विवाह समारंभाचे सर्व विधी रात्री नऊ पूर्वी संपवावे लागणार आहेत तसेच विवाहला उपस्थित असणाऱ्या लोकांसाठी जेवणाची जी सोय करण्यात येणार आहे त्यामध्ये फक्त एकच डिश असावी असे आदेशही देण्यात आले आहेत मेहंदी संगीत आणि विवाहाच्या इतर विधींमध्ये सुद्धा खर्चाची कपात करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
औषध दुकाने पेट्रोल पंप आणि रुग्णालये या ठिकाणचे लाईटच रात्री नऊनंतर सुरू ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे वीजेची बचत केली तर मोठ्या प्रमाणावर खर्चातही बचत होईल असे सरकारला वाटत असल्याने मोठमोठे मॉल्स थेटर्स आणि जेथे विजेचा जास्त वापर होतो अशा सर्व संस्थांना रात्री नऊ पूर्वी आपले व्यवहार बंद ठेवण्याचे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत शिवाय पाकिस्तानमध्ये आता सरकारी कार्यालयांमध्ये पाच दिवसांचा आठवडा योजना लागू करण्यात येणार आहे आठवड्यातील दोन दिवस सरकारी कार्यालय बंद राहणार असल्याने खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात होईल असे ही सरकारला वाटत आहे.