मुंबई – एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाचे वर्णन माकडांचे नृत्य असे केले आहे. महाविकास आघाडीला या प्रकरणाचा विचार करू द्या, असे ओवेसी म्हणाले. उलगडणाऱ्या नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे ४० आमदार बंडखोर झाले आहेत. बंडखोर आमदारांचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. सध्या हे बंडखोर आमदार आसाममधील गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत.
#WATCH | Let Maha Vikas Aghadi deliberate over this matter. We are keeping an eye on the unfolding drama… It looks like a dance of monkeys. They are acting like monkeys jumping from one branch to another: AIMIM chief Asaduddin Owaisi on the political crisis in Maharashtra pic.twitter.com/RUUc9xRyUb
— ANI (@ANI) June 25, 2022
आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे असदुद्दीन ओवेसी शनिवारी महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यावर म्हणाले, ‘महाविकास आघाडीला या प्रकरणाचा विचार करू द्या. आम्ही उलगडणार्या नाटकावर लक्ष ठेवून आहोत… ते माकड नृत्यासारखे दिसते. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारणाऱ्या माकडांसारखे ते वागत आहेत.’ असंही ते म्हणाले.