जालना – कौटुंबिक वादातून पतीने दुसरी पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना जालना शहरातील सोनलनगर येथे घडली आहे. भारती सातार (वय 36), वर्षा सातारे (17) असे हत्या केलेल्यांची नावे आहेत. गणेश सातारे असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी जालना पोलिसात गणेश सातारे आणि त्याची पहिली पत्नीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
आरोपी गणेशने पहिल्या पत्नीच्या मदतीने दोघींच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या केली आहे. या दोघी-मायलेकींचे मृतदेह आज सकाळी राहत्या घरात आढळून आले. मयत भारती सातारे यांचे पती गणेश सातारे यांना दोन पत्नी आहेत. त्यांच्यात सतत कौटुंबिक वादा होत असत. त्यातूनच हे खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.