वॉशिंग्टन – भारतीय संस्कृतीमध्ये अक्षयतृतीया ही नेहमीच एक महत्त्वाची आणि पवित्र तिथी समजली जाते या दिवसाचा मुहूर्त साधून भारतीय कुटुंबांमध्ये विशेषता भारतीय महिलांमध्ये सोने खरेदी करण्याकडे कल असतो. आज मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या अक्षयतृतीया सणाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला आणि सोने याबाबत एका अतिशय मनोरंजक आकडेवारी समोर आली आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिल या जगद्विख्यात संस्थेने दिलेल्या माहितीप्रमाणे जगातील एकूण सोन्यापैकी तब्बल अकरा टक्के सोने फक्त भारतीय महिलांकडे आहे. सोन्याच्या मालकीचा विचार करता भारतीय महिला अमेरिका आणि रशियापेक्षाही श्रीमंत मानल्या जातात कौंसिलने दिलेल्या माहितीप्रमाणे भारतीय महिलांकडे जे सोने आहे. त्याचे वजन तब्बल एकवीस हजार 733 टन इतके आहे. जगातील विविध देशांकडे असणाऱ्या सोन्याचा साठ्यांचा विचार करता भारतीय महिला त्या देशांपेक्षाही खूप श्रीमंत आहेत. विविध देशांकडे असलेला
सोन्याच्या साठ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
अमेरिका 8133 टन
रशिया 2298 टन
जर्मनी 3362 टन
इटली 2451 टन
फ्रान्स 2436 टन
चीन 1948 टन
स्वित्झर्लंड 1040 टन
म्हणजेच रशिया आणि अमेरिका यांच्या एकत्रित सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त सोने भारतीय महिलांकडे आहे