नवी दिल्ली – देशात करोनाची चिंता दिवसागणीक वाढत जात असल्याचे चिन्ह दिसून येत आहे. आज सोमवार रोजी देशात एकूण 3 हजार 157 नवीन करोना रुग्ण आढळले आहेत. आता भारतात करोना बाधितांची एकूण संख्या 4,30,79,188 झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 500 वर पोहचली आहे.
सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या 24 तासात करोनामुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या 24 तासात 2 हजार 723 जणांनी करोनावर मात केली आहे. अशाप्रकारे, देशाचा रिकव्हरी दर 98.74 टक्के राहिला आहे, तर मृत्यू दर 1.22 टक्के आहे. 26 मृत्यूंसह देशातील एकूण मृतांची संख्या 5 लाख 23 हजार 869 वर पोहोचली आहे.