जगदिशपूर – एकाचवेळी 75 हजार जणांनी एकाचवेळी राष्ट्रध्वज फडकावण्याची अभूतपूर्व घटना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज उपस्थितीत आज पार पडली. यापूर्वी पाकिस्तानने 18 वर्षांपूर्वी केलेल्या विक्रमाला मोडून जागतिक विक्रम करण्याच्या हेतून हा उपक्रम करण्यात आले होता.
जगदिशपूरचे तत्कालिन राजे वीर कुंवर सिंह यांच्या 163 जयंतीनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 1857 च्या उठावातील एक नायक म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा उपक्रम आयोजित केला गेला होता.
शाह यांच्यासोबत केंद्रीय मंत्री आर के सिंग आणि नित्यानंद राय, उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी आणि माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्यासह बिहारमधील भाजप नेते पूर्ण पाच मिनिटे तिरंगा फडकवत होते.
गिनीज रेकॉर्डसाठी या संपूर्ण उपक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले. प्रत्यक्ष उपक्रमामध्ये 77,700 जणांनी सहभाग घेतल्याचे नंतर जाहीर करण्यात आले.यापूर्वी 2004 मध्ये पाकिस्तानमध्ये 56,600 जणांनी एकाचवेळी राष्ट्रध्वज फडकावला होता. पाकिस्तानचा हा विक्रम आज मोडीत काढण्यात आला.