मुंबई – आयपीएलमध्ये आज 36 वा सामना खेळला जात आहे. शनिवारच्या दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ अवघ्या 68 धावा करून सर्वबाद झाला. सनरायझर्स हैदराबादला हा सामना जिंकण्यासाठी 69 धावांची गरज आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि बेंगळुरूला 16.1 षटकांत 68 धावांत गुंडाळले.
After a superlative bowling performance, #SRH will be back for their run-chase
Join us for all the action in a bit and follow the game here: https://t.co/f9ENkwNWAn#TATAIPL | #RCBvSRH | #IPL2022 pic.twitter.com/BPAQf5ZdLr
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
बेंगळुरूकडून सुयश प्रभुदेसाईने सर्वाधिक 15 धावा केल्या तर हैदराबादकडून नटराजन आणि येनसेनने प्रत्येकी तीन बळी घेतले. बेंगळुरूकडून तीन खेळाडूंना खातेही उघडता आले नाही. विराट कोहली सलग दुसऱ्या गोल्डन डकवर बाद झाला, तर दिनेश कार्तिक आणि अनुज रावत शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले. तर केवळ दोनच खेळाडूंना दुहेरी धावसंख्या गाठ अंकात धावा करू शकले.
कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद
विराट कोहलीची आयपीएल 2022 च्या या मोसमात शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी कोहली लखनऊ विरुद्धच्या सामन्यातही भोपळा न फोडता बाद झाला होता. विशेष म्हणजे कोहली लखनऊ आणि आताच्या हैदराबाद विरुद्धच्या या दोन्ही सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
आयपीएलच्या इतिहासातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 2017 मध्ये आरसीबीचा संघ 49 च्या स्कोअरवर ऑलआऊट झाला होता. आरसीबी चौथ्यांदा 70 किंवा त्याहून कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाली आहे.