मुंबई – गुजरात संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा आठ धावांनी पराभव करत आयपीएलच्या हंगामातील सहावा विजय नोंदवला आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 156 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाताला केवळ 148 धावा करता आल्या आणि आठ धावांनी सामना गमवावा लागला.
WHAT A WIN! 👊@gujarat_titans win by 8 runs and are back to the 🔝 of the table 👏#TATAIPL #KKRvGT pic.twitter.com/PylbPa6HD1
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 18 धावांची गरज होती. आंद्रे रसेल स्ट्राइकवर असल्याने त्याच्यासाठी हे फार अवघड काम नव्हते. त्याने पहिल्या चेंडूवर षटकारही मारला, पण दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला आणि यासह कोलकाताचा पराभव निश्चित झाला. उरलेल्या चार चेंडूंमध्ये उमेश आणि साऊथी केवळ तीन धावा करू शकले आणि कोलकाता संघाचा आठ धावांनी पराभव झाला.
कोलकाताकडून फलंदाजीत आंद्रे रसेलने 25 चेंडूत सर्वाधिक 48 तर रिंकू सिंगने 28 चेंडूत 35 धावांची खेळी केली. गुजरातकडून मोहम्मद शमी ,राशिद खान आणि यश दयाल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, गुजरातने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने 20 षटकांत 156 धावा केल्या. कर्णधार हार्दिकने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. याशिवाय साहाने 25 आणि मिलरने 27 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कोलकाताकडून गोलंदाजीत आंद्रे रसेलने सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. याशिवाय टीम साऊदीने 3 तर उमेश यादव आणि शिवम मावीने प्रत्येकी एक विकेट घेतली.