मुंबई – बिग बॉसची ओटीटीची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री ‘उर्फी जावेद’ दररोज तिच्या कपड्यांबद्दल नेहमीच चर्चेत असते. कोणत्याही गोष्टीची तमा नबाळगता उर्फी स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. फॅन्स सुद्धा तिच्या बोल्ड लूकवर कमेंटचा वर्षाव करत असतात.
View this post on Instagram
बिग बॉस मध्ये उर्फी जावेदचा प्रवास खूपच लवकर समाप्त झाला. मात्र स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर ती सोशल मीडियावरून खूपच ऍक्टिव्ह राहते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. फॅन्स देखील तिच्या या हटके फोटो-व्हिडिओला चांगलीच पसंती देतात.
View this post on Instagram
नुकतंच उर्फीने आपल्या इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोट शेअर केले असून, पुन्हा एकदा ती नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये उर्फी जावेदने तपकिरी रंगाची पँट परिधान केलेली आहे. या पँटेवरच तशीच आणखी एक पँट तिरकी करून लावलेली आहे.
View this post on Instagram
अशा दोन-दोन पँटेतील ही ललना पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले. उर्फीचे हे अतरंगी फोटो नेहमीच सोशल मीडियावर थट्टेचा विषय बनत असतात. उर्फी मूळची लखनौची आहे. मात्र, बिग बॉस ओटीटी’मुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली.