पुणे – आयआयटी, एनआयटी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जेईई ऍडव्हान्स पुढे ढकलण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार 3 जुलैला ही परीक्षा होणार होती. आता जेईई ऍडव्हान्स ही प्रवेश परीक्षा 28 ऑगस्ट रोजी होणार आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयआयटी मुंबई यांच्यामार्फत ही परीक्षा होणार आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई मेन परीक्षा अनिवार्य आहे. त्यानंतरच्या पुढच्या टप्प्यात आयआयटी, एनआयटी या संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई ऍडव्हान्स ही परीक्षा देणे विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. त्यावरूनच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. जेईई ऍडव्हान्स ही प्रवेश परीक्षा 3 जुलै रोजी होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते.