माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार : “श्रीधर कृपा’ प्रकल्पाचा शुभारंभ
कोथरूड –बांधकाम क्षेत्रात विश्वासाचं नातं जपणारा ग्रुप म्हणून आज बढेकर ग्रूपकडे पाहिले जाते. “नम्रपणा, जिद्द, चिकाटी आणि आपलेपणा’ त्यांच्याकडे आहे. आज त्यांचे मोठे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत ते केवळ त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासाच्या नात्यामुळेच, असे गौरवोद्गार माजी कृषी मंत्री शशिकांत सुतार यांनी काढले.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बढेकर ग्रुपच्या वतीने कोथरुडमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळील भेलकेनगरमध्ये सुरू करण्यात आलेल्या “श्रीधर कृपा’ या प्रकल्पाचा शुभारंभ सुतार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, बढेकर ग्रुपचे संस्थापक केशव बढेकर, चेअरमन प्रवीण बढेकर, बढेकर ग्रूपचे पार्टनर पृथ्वीराज सुतार, नानासाहेब भेलके, दादासाहेब भेलके यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रवीण बढेकर म्हणाले, “आज बढेकर ग्रुपचे तब्बल 30 लाख चौरस फुटांचे काम सुरू असून, ते केवळ कोथरूडकरांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच. या बांधकाम व्यवसायाच्या वाटचालीत अनेकांनी आमच्यावर विश्वास दाखवला असून, तेच विश्वासाचे जपत बढेकर ग्रुपची यशस्वी वाटचाल सुरू आहे. आतापर्यंतच्या प्रकल्पांप्रमाणेच या प्रकल्पाचे काम वेळेतच पूर्ण करून दिले जाईल.’ यावेळी गायक जितेंद्र भुरुक यांच्या हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रमाने मने जिंकली.
२००९ मध्ये बढेकर ग्रुप या नावाने बांधकाम व्यवसायामध्ये प्रवासाला सुरुवात केली. ‘नाते विश्वासाचे’ हे ब्रीदवाक्य वापरत त्यांनी सामान्यांना परवडतील अशी घरे बांधून दिली. अत्यंत कमी काळामध्ये लोकांचा विश्वास संपादन करत आज अग्रगण्य बांधकाम व्यावयायिकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. ‘वस्तू विकण्यापेक्षा वास्तू विकावी’ अशी प्रवीण बढेकर यांची विचारसरणी आणि दूरदृष्टी यामुळेच ‘बढेकर ग्रुप’ नावलौकिकास आला आहे.