पुणे – पुनित बालन ग्रुप आयोजित तिसऱ्या एस. बालन टी-20 लीग अजिंक्यपद आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत केदार जाधव क्रिकेट अकादमी आणि गेमचेंजर्स इलेव्हन या संघांनी स्पर्धेत विजयांचा चौकार मारला. या स्पर्धेत केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने माणिकचंद ऑक्सिरीच संघाचा 8 गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना माणिकचंद ऑक्सिरीच संघाने 18 षटकांत 7 गडी गमावून 137 धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान केदार जाधव क्रिकेट अकादमी संघाने 15.3 षटकांत व 2 गडी गमावून पूर्ण केले.
गेमचेंजर्स इलेव्हन संघाने जिनवानी इलेव्हन संघाचा 4 गडी राखून पराभव करत सलग चौथा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना जिनवानी इलेव्हन संघाने 20 षटकांत 1 गडी गमावून 140 धावा धावफलकावर लावल्या. गेमचेंजर्स इलेव्हन संघाने हे आव्हान 16.2 षटकांत व 6 गडी गमावून पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक – (गटसाखळी फेरी )
1) माणिकचंद ऑक्सिरीच : 18 षटकात 7 बाद 137 धावा. (ओंकार खाटपे 83, अविनाश शिंदे 17, अक्षय चव्हाण 2-25, अमीश शेख 2-17) पराभूत वि. केदार जाधव क्रिकेट अकादमी ः 15.3 षटकात 2 बाद 141 धावा. (विशाल भिलारे नाबाद 50, रोहित करंजकर नाबाद 41, मंदार भंडारी 31, निखिल भोगले 1-24). सामनावीर ः रोहित करंजकर.
2) जिनवानी इलेव्हन : 20 षटकात 1 बाद 140 धावा. (नितीश सप्रे नाबाद 63, हिमांशू अगरवाल 23, सौरभ जळगावकर नाबाद 36) पराभूत वि. गेमचेंजर्स इलेव्हन ः 16.2 षटकांत 6 बाद 144 धावा. (तुशार श्रीवास्तव 55, रोहन दामले 29, नौशाद शेख 28, कनिष्क सिंग 4-19). सामनावीर ः तुषार श्रीवास्तव.