नवी दिल्ली – रशिया- युक्रेन युध्दामुळे सोने व चांदीचे दर सध्या अस्थिर आहेत. शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात माफक वाढ नोंदली गेली. सोन्याचा दर 30 रुपयांनी वाढून 51,827 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 596 रुपयांनी वाढून 69,089 रुपये रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,956 डॉलर व चांदीचा दर 25.54 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे उपाध्यक्ष नवनीत दमाणी यांनी सांगितले की रशिया- युक्रेन युद्धामुळे गेल्या तीन आठवड्यांमध्ये सोने आणि चांदीचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. महागाईमुळे काही लोक सोन्याचा आधार घेत असल्याचे दिसून येत आहे.