माद्रीद – स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याला पुन्हा एकदा दुखापत झाली असून, त्यामुळे पुढील काही काळ त्याला व्यावसायिक टेनिसपासून दूर राहावे लागत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी नदालला किमान सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील अंतिम लढतीत टेलर फ्रिट्ज विरुद्धच्या सामन्यात त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता तसेच त्याच्या छातीतही दुखत होते. त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला काही दिवस कोर्टवर उतरता येणार नाही. गेल्या वर्षीही दुखापतीमुळे त्याला अनेक स्पर्धेला मुकावे लागले होते. आता पुन्हा त्याच्यावर विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.