मुंबई – भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू विनोद कांबळी याला मद्यपान करुन गाडी चालवत अन्य व्यक्तीच्या गाडीला धडक दिल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अटक केली. काही वेळातच त्याला जामीनावर सोडण्यातही आले.
मद्यपान करत नशेत गाडी चालवत आपल्याच सोसायटीतील रहिवाशाच्या गाडीला धडक मारल्याप्रकरणी कांबळीवर भारतीय दंडसंहितेच्या 279, 336 आणि 427 कलमांसह मोटरव्हेईकल ऍक्ट 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास वांद्रे पोलिस करत आहेत.