नवी दिल्ली – केंद्र सरकार चालू खात्यावरील तूट वाढू नये याकरिता सोन्याची आयात कमी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत सोन्याची आयात दुपटीने वाढली आहे. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार एप्रिल -डिसेंबर या काळात सोन्याची आयात 38 अब्ज डॉलरची झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत 17 अब्ज डॉलरची सोन्याची आयात झाली होती.
डिसेंबर महिन्यात सोन्याची आयात वाढून 4.8 अब्ज डॉलरची झाली आहे. सोन्याची आयात वाढल्यामुळे वाढल्यामुळे एप्रिल ते डिसेंबर या कालावधीतील चालू खात्यावरील तूट 142 अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत चालू खात्यावरील तूट केवळ 61 अब्ज डॉलर इतकी होती. एप्रिल ते डिसेंबर या काळात चांदीची आयात वाढून दोन अब्ज डॉलरची झाली आहे. गेल्या वर्षी या काळात चांदीची आयात केवळ 762 दशलक्ष डॉलरची झाली होती. चीननंतर भारत जगात सगळ्यात जास्त सोने आयात करतो.