नवी दिल्ली – जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदार सोने खरेदी करीत आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात एकतर्फी वाढ होताना दिसून येत आहे.
सोमवारी दिल्ली सराफात सोन्याचा 176 रुपयांनी वाढून 47,881 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 505 रुपयांनी कमी होऊन 61,005 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,822 डॉलर व चांदीचा दर 23.03 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे अमेरिकेच्या रोख्यावरील परतावा कमी होत आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर डॉलर कमकुवत होण्याची शक्यता आहे. अशा अवस्थेत आपले उत्पन्न स्थिर राहावे याकरिता बरेच गुंतवणूकदार सोन्याची खरेदी करीत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात लघु ते मध्यम पल्ल्यास सोन्याचे दर वाढत राहण्याची शक्यता आहे. करोणा विषयक परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर सोन्याचे दर स्थिर होऊ शकतात असे बोलले जाते.