अकोला – पाणी भरताना बोअरवेल मशीनचा शाॅक लागून शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना अकोल्यातील दहिगाव गावंडे येथे घडली. राहुल पुणाजी धांडे असे मृत्यू पावलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. धांडे हे धोतरडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते.
सकाळी पाणी भरण्यासाठी बोअरवेल मशीन सुरु करण्यासाठी धांडे गेले होते. यावेळी शाॅर्टसर्किट झाल्याने विजेचा प्रवाह मशीनमध्ये उतरला होता. मशीन सुरु करण्यासाठी हात लावताच जोरात धक्का बसून ते खाली कोसळले. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. धांडे हे अकोल्यातील धोतरडी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर दहिगाव गावंडे येथे ते राहत असत. एक शिस्तप्रिय व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.