जळगाव – गाईचा गोठा शेड बांधण्यासाठीची वर्क ऑर्डर काढण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समितीतील कनिष्ठ लिपीकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. वसंत पंडीत बारी असे लाचखोर लिपीकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना गाईचा गोठा शेड बांधणीचा प्रस्ताव मंजुर झाला होता. त्याची वर्क ऑर्डर काढायची होती. यासाठी लाचखोर लिपीक बारी यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करून तक्रार दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून बारी यांना जामनेर पंचायत समिती कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. पुढील कारवाई सुरु आहे.