शिक्रापूर, (वार्ताहर)- मुखई (ता. शिरुर) येथील नाथू पुजारी यांच्या शेतातील पाण्याचे मोटारचे स्टार्टर बंद पडल्याने सतीश धुमाळ हे स्टार्टर दुरुस्त करत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने ते बाजूला पडले.
दरम्यान ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सतीश नानासो धुमाळ (वय 40, रा. मुखई) यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याबाबत रमेश शामराव पलांडे (वय 54) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.