अलित्रापूर (मध्य प्रदेश)- मध्य प्रदेशात एक प्रवासी बस नदीमध्ये पडून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर 28 जण जखमी झाले आहेत. मध्य प्रदेशातील अलित्रापूर जिल्ह्यात आज सकाळी हा अपघात झाला. मृतांमध्ये एक वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. हा अपघात आज सकाळी जिल्हा मुख्यालयापासून 15 किलोमीटरवरील चांदपूर गावाजवळ घडला.
ही बस अलित्रापूरवरून गुजरातमधील छोटा उदपूरला जात होती, असे पोलीस अधीक्षक मनोज कुमार सिंह यांनी सांगितले.
बसचालकाला डुलकी लागली असावी, त्यामुळे बस मलखोद्रा नदीमध्ये कोसळली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. जखमींपैकी तिघेजण गुजरातमधील आहेत. जिल्हाधिकारी मनोज पुष्प यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि जखमींवरील उपचारांबाबत डॉक्टरांना सूचनाही दिल्या.