मुंबई – या आठवड्यात शेअर निर्देशांक काही प्रमाणात वाढल्यानंतर काही गुंवणूकदारांनी नफा काढून घेण्यासाठी विक्री केल्यामुळे शेअर निर्देशांकात माफक घट झाली असल्याचे दिसून आले. बाजार बंद होतांना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 90 अंकांनी कमी होऊन 57,806 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 19 अंकांनी कमी होऊन 17,213 अंकांवर बंद झाला.
बॅंका, आयटी कंपन्या, धातू क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरची आज विक्री झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्ससंबंधातील 19 कंपन्याच्या शेअरच्या भावात घट झाली तर 11 कंपन्याच्या शेअरच्या भावात वाढ झाली असल्याचे दिसून आले.
स्टेट बॅंक, आयटीसी, टेक् महिंद्रा, टाटा स्टील, कोटक बॅंक या कंपन्याच्या शेअरच्या भावात घट झाली. तर सन फार्मा, इंडस् इंड बॅंक, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्याच्या शेअरच्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले.
ओमायक्रॉन फारसा घातक नसल्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजार निर्देशांकात मोठया प्रमाणात वाढ झाली असली तरी आता बऱ्याच देशात आणि भारतातील मोठ्या शहरात निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्यामुळे गुंवणूकदारांचे या घटनाक्रमाकडे लक्ष राहण्याची शक्यता असल्याचे दिसूून येते.
दोन दिवस वातावरण मंद राहणार
आगामी काळाबाबत बोलतांना आशिका स्टॉक ब्रोकींग या संस्थेचे संशेधन प्रमुख अर्जित मालकर यांनी सांगितले की, नफ्यासाठी काही गुंतवणकूदारांनी आज विक्री केली. आता जागतीक पातळीवर 2 दिवस शेअर बाजार बंद राहणार आहेत. त्यामुळे निर्देशांकात फारसे चढ उतार होण्याची शक्यता कमी आहे.